logo

पिंपरी चिंचवड:दळवीनगर,आनंदनगर साईबाबानगर चिंचवड स्टेशन मधील हजारो झोपडपट्टी मधील नागरिकांना रेल्वे मंत्रालयाने उच्च ‌न्य

पिंपरी चिंचवड:दळवीनगर,आनंदनगर साईबाबानगर चिंचवड स्टेशन मधील हजारो झोपडपट्टी मधील नागरिकांना रेल्वे मंत्रालयाने उच्च ‌न्यायालयाचा संदर्भ देऊन १५ दिवसात घरे खाली करण्याच्या नोटिसा वाटप करण्यात आले.मात्र कारवाई करु नये यासाठी या भागाचे स्थानिक नगरसेवक माजी विधी समिती सभापती काळूराम पवार अशी मागणी केली आहे.
यावेळी दळवी नगर मधील रेल्वे लगत राहणाऱ्या नागरिकांना दुबार नोटीस देऊन पुणे येथील रेल्वेच्या मुख्य कार्यालयात बोलावून घेतले होते.त्यामुळे या परिसरातील जेष्ठ नागरिक,महिला,आणि तरुण मंडळी या रेल्वेच्या कार्यालयात दाखल झाले होते.यानिमित्ताने झोपडपट्टी मधील नागरिकांच्या हक्क संघर्ष समितीच्या वतीने मध्य रेल्वे अधिकारी गौतम मुसळे यांची रेल्वे मुख्यालयात पुणे स्टेशन येथे भेट घेण्यात आली.
यामध्ये सर्वपक्षीय व सामाजिक राजकीय संघटनाच्या पदाधिकारयाचा समावेश होता.रेल्वे चे अधिकारी मुसळे यांनी आम्हाला रेल्वे बोर्ड दिल्ली कडुन आदेश आले आहेत रेल्वे विभागाला दर पंधरा दिवसांनी माहिती सादर करावी लागते त्यामुळे दिल्ली कडुन स्थगिती आदेश येत नाही तो पर्यंत हि कारवाई सुरुच राहणार असे मुसळे यांनी स्पष्ट केले.याला आक्षेप घेताना यावेळी मारुती भापकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देऊन यामध्ये सुरत ते जळगाव रेल्वे लाईन टाकताना अडथळा ठरणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या हद्दीत झोपडपट्टी बाबत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.हा निर्णय देताना वेगवेगळ्या राज्यांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनासाठी धोरणाचा विचार करून योग्य पर्याय काढावा असे न्यायालयने स्पष्ट केले आहे.हा निर्णय पश्चिम रेल्वे साठी असताना आपले रेल्वे प्रशासन मध्ये रेल्वे विभागात त्याचा आधार घेऊन हि कारवाई आपले रेल्वे प्रशासन करत आहे हे दुर्दैव म्हणावे लागेल.त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. आनंदनगर, साईबाबानगर,दळवीनगर या झोपडपट्टया गेल्या ५० वर्षांपासून या ठिकाणी वसलेल्या आहेत.या झोपडपट्टया घोषीत असुन या झोपडीधारकांकडे फोटोपास आहेत.मतदार यादीत या लोकांची नावे आहेत.अशा लोकांची व्यवस्था पुनर्वसना शिवाय कारवाई करता येत नाही.अशी महाराष्ट्रातील प्रचिलित कायद्यात तरतूद असताना आपले रेल्वे प्रशासन हि अन्यायकारक कारवाई करत आहे.त्यामुळे रेल्वे आणि महापालिका प्रशासन गेल्या ५०वर्षापासून का डोळेझाक करत होते झोपले होते का? एवढ्या वर्षांत का पुनर्वसन केले नाही.यावेळी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी मुसळे यांच्या प्रश्नाला उत्तर देत माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी यांनी आक्षेप घेताना महापालिकेने पन्नास वर्षांत पुनर्वसन केले नाही हि त्यांची चुक झाली मात्र पन्नास वर्ष हे लोक राहतात त्यावेळी रेल्वे प्रशासन झोपले होते का? असा सवाल उपस्थित करून त्या अधिकाऱ्यांची बोलती बंद केली. माजी विधी समिती सभापती काळुराम पवार यांनी भावना व्यक्त करताना म्हणाले की, आनंद नगर मध्ये मी २कोटी रुपये खर्च करून रेल्वे जवळ महापालिका प्रशासनाने सीमाभिंत बांधून दिली.यामुळे रेल्वेची सुरक्षितता लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला. त्यावेळी रेल्वेचे प्रशासन का गप्प होते.जाणीवपूर्वक दळवी नगर ,आनंद नगर आणि साई बाबा नगर मधील राहिवाश्यांना त्रास दिला जात आहे हे सर्वश्रुत आहे.पुढील आंदोलन हे तीव्र स्वरूपात होईल असा इशाराही यावेळी माजी विधी समिती सभापती काळूराम यांनी दिला.सामाजिक कार्यकर्ते मारुती अण्णा पंद़ी यांनी हि आमच्या लोकांच्या झोपा उडाल्या असुन लोक जेवण करत नाही,आजारी जेष्ठ लोक टेंशन मधे आहे.त्याचा या कारवाईत रेल्वे बळी घेणार का? यावेळी शमीम पठाण,नेताजी शिंदे लक्ष्मी देवकर,गणेश लंगोटे, ब्रह्मानंद जाधव,उत्तम कसबे,केएस रेड्डी आणि दळवी नगर मधील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

0
14635 views